विशेष बातम्या
‘राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता’ ग्रंथाचे शनिवारी प्रकाशन
By nisha patil - 6/18/2025 9:51:34 PM
Share This News:
‘राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता’ ग्रंथाचे शनिवारी प्रकाशन
कोल्हापूर, दि. १८ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवी वर्षानिमित्त श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने संपादित केलेल्या ‘राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता’ या ग्रंथाचे प्रकाशन शनिवार, २१ जून रोजी सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे.
या ग्रंथाचे प्रकाशन खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते तर अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मानसिंग विजयराव बोंद्रे असतील. या कार्यक्रमाला राहुल पी. पाटील (राजीवजी सहकारी सूतगिरणी), राजेश पाटील (केडीसी बँक), डॉ. प्रकाश बच्छाव (उच्च शिक्षण विभाग), आणि अॅड. डॉ. रमेश विवेकी (ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट निर्माते) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शहाजी महाविद्यालयात शाहू महाराजांच्या विचारांवर आधारीत १५ हून अधिक उपक्रम पार पडले असून, विचारवंतांच्या व्याख्यानातून साकारलेले विचार या ग्रंथाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे पुस्तक निर्मिती प्रकाशनने प्रकाशित केले आहे.
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, अनिल म्हमाने, आर. जे. भोसले, एम. व्ही. भोसले, डॉ. पी. बी. पाटील हे प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक असून, त्यांनी सर्वांना या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
‘राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता’ ग्रंथाचे शनिवारी प्रकाशन
|