राजकीय
राजारामपुरी प्रभाग १५ मध्ये विकास आघाडीच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ...
By nisha patil - 6/1/2026 5:10:24 PM
Share This News:
राजारामपुरी प्रभाग १५ मध्ये विकास आघाडीच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ...
महानगरपालिका प्रभाग क्रमांक १५ मधून विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज राजारामपुरी परिसरात उत्साहात पार पडला. ठाकरे गटाच्या प्रतिज्ञा उत्तुरे, काँग्रेसचे रोहित कवाळे, अश्विनी कदम आणि संजय वसंतराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
काँग्रेसचे नेते मालोजीराजे छत्रपती आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्या हस्ते प्रचार कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांनी मारुती मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले व संपूर्ण परिसरात भव्य प्रचार फेरी काढली.
काँग्रेसचा हात व ठाकरे गटाचे मशाल चिन्ह असलेले स्कार्फ परिधान करून कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या, “आजची नागरिकांची उपस्थितीच आमच्या विजयाची नांदी आहे. या विश्वासाच्या जोरावर निश्चितपणे यश मिळेल.”
या प्रचार फेरीत विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राजारामपुरीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकजूट, उत्साह आणि जनसमर्थन यामुळे ही प्रचार फेरी विजयाच्या दिशेने निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
राजारामपुरी प्रभाग १५ मध्ये विकास आघाडीच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ...
|