बातम्या
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं...; नेमकं काय घडलं
By nisha patil - 8/10/2026 3:10:14 PM
Share This News:
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं...; नेमकं काय घडलं
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यात निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गोव्यातील निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. पहाटे 5 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रुग्णालयात डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे CPR देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणाची मेडिको-लीगल केस म्हणून नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच परखड वक्तव्ये, बिनधास्त स्वभाव आणि साधी जीवनशैली यामुळे नाना पाटेकर यांनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.
विशेष म्हणजे, निधनाच्या अवघ्या चार दिवस आधीच ते गोव्यातील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील त्यांचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अगदी उत्साहात दिसणारे नाना अचानक आपल्यातून निघून गेल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक अष्टपैलू आणि प्रभावी कलाकार गमावला आहे. त्यांच्या निधनाने कला, मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं...; नेमकं काय घडलं
|