बातम्या

पश्चिम घाटातील विपुल जैवविविधता टिकवण्याचे आव्हान : दीपक देवलापूरकर 

The challenge of preserving the rich biodiversity of the Western Ghats Deepak Devlapurkar


By Administrator - 5/3/2026 2:37:29 PM
Share This News:



पश्चिम घाटातील विपुल जैवविविधता टिकवण्याचे आव्हान : दीपक देवलापूरकर 

शहाजी महाविद्यालयात भित्तीपत्रक व व्याख्यानाचे आयोजन 

कोल्हापूर: पश्चिम घाटात देशातील इतर जैवविविधतेपेक्षा विपुल प्रमाणात जैवविविधता आहे ती टिकवणे सध्या मोठे आव्हान आहे. माधव गाडगिळ  समितीने सादर केलेला अहवाल न स्वीकारल्याने पर्यावरणाचा ऱ्हास वाढला आहे. खनिजे जंगल,वाळू यांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय वन्यजीव व मानव यांच्यामध्ये संघर्ष वाढत चालला आहे, असे प्रतिपादन जनस्वास्थ्य दक्षता समितीचे दीपक देवलापूरकर यांनी केले. दसरा चौक येथील श्री शाहू शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण होते.
 प्राचार्य डॉ. शानेदिवाण  म्हणाले, सद्यस्थितीत पर्यावरण विषय आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जीवन सक्षमपणे जगायचे असेल तर आपणाला पर्यावरण वाचवले पाहिजे. आज पाहिलं तर धरण क्षेत्र किंवा पाणलोट क्षेत्र फार्म हाऊसनी  व्यापली आहेत.सर्वांनी निसर्गाकडे जाऊ पक्ष्यांची संवाद साधला पाहिजे. पर्यावरण शास्त्राच्या प्रा. सौ. दीपा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र  पाटील यांनी केले. प्रा. सागर चरापले यांनी आभार  मानले. यावेळी नॅक  समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए बी बलुगडे पर्यवेक्षक प्रा. पि.के. पाटील आदींसह प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.

 


पश्चिम घाटातील विपुल जैवविविधता टिकवण्याचे आव्हान : दीपक देवलापूरकर 
Total Views: 13