विशेष बातम्या
शाहूपुरी पोलिसांची चतुराई!
By nisha patil - 7/25/2025 9:27:12 PM
Share This News:
शाहूपुरी पोलिसांची चतुराई!
२४ तासांत ५.३० लाखांचे सोनं हस्तगत; दोन महिला अटकेत
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पर्समधून चोरीस गेलेल्या ५ लाख ३० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत हस्तगत केले. या प्रकरणी शुभांगी पवार (३६) आणि मंजुळा पवार (३२) या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना २४ जुलै रोजी सकाळी ९.१५ वाजता घडली होती. फिर्यादी धनश्री पाटील या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दागिने चोरले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोघींना अटक करून दागिने वसूल करण्यात आले.
या यशस्वी कारवाईबद्दल शहरवासीयांकडून पोलीस दलाचे कौतुक होत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले करीत आहेत.
शाहूपुरी पोलिसांची चतुराई!
|