ताज्या बातम्या

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा "सतेज कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तुफान तुडुंब गर्दी प्रदर्शनाच्या तीन दिवसात ६ कोटीच्या आसपास उलाढाल

The conclusion will be held today


By nisha patil - 8/12/2025 12:40:32 PM
Share This News:



कोल्हापूर: तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला आज तिसऱ्या रविवारच्या  दिवशी तरुण शेतकरी शालेय विद्यार्थी, शेतकऱ्यांनी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी तुडुंब गर्दी केली होती.तीन दिवसात उच्चांकी तांदळाची विक्री झाली आहे. महिलांनी खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून तीन दिवसात ४० लाखांची उलाढाल ही झाली आहे. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे यांची याठिकाणी नोंदणी ही शेतकऱ्यांनी केली आहे.

तीन दिवसात ६ कोटींच्या आसपास उलाढाल झाली आहे.आजरा घनसाळ आणि आजरा इंद्रायणी,रत्नागिरी २४ तांदळाची  उच्चांकी विक्री झाली असून मागणी वाढत चालली आहे. याचबरोबर नाचणी, हळद आणि सेंद्रिय गुळ यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे.आज सोमवार प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने आणखी शेतकऱ्यांच्या तांदळाची विक्री होणार आहे.तरी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांनी भेट देण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
       पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असे "सतेज कृषी  प्रदर्शन चार दिवस आयोजित करण्यात आले आहे.५ डिसेंबर  पासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाच्या आजच्या  तिसऱ्या दिवशी रविवार सुट्टी होती त्यामुळे लोकांनी व
कोल्हापूरसह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,इचलकरंजी,बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण  भागातील शेतकऱ्यांनी तुफान, तुडुंब गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी तपोवन मैदानावर केली होती.
       
*आज सोमवार ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता प्रदर्शनाचा सांगता समारंभ होणार आहे. आज प्रदर्शनस्थळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट दिली.
       
यावर्षी सतेज कृषी प्रदर्शनामध्ये वधुवर सुचक केंद्र उभे करण्यात आले होते. या ठिकाणी वधू-वरांची ४०० हून अधिक नाव नोंदणी झाली आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने प्रथमच सतेज कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉल मांडण्यात आला आहे. वृक्ष लागवड संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन केले जात आहे. उद्योग विभागाच्या वतीने ही या ठिकाणी महिलांसाठी घरबसल्या केल्या जाणाऱ्या  व्यवसायबाबत  माहिती दिली जात आहे.

         राधा म्हैस  ठरली प्रदर्शनाचे खास आकर्षण

*गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड  आणि इंडिया बुक रेकॉर्ड करणारी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी गावची तीन फुटाची राधा म्हैस सतेज कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. 
      कोल्हापुरातील मंदार इंगवले यांचा क्राउड किंग नावाने परिचित असलेला कोल्हापूरकरांचा भुत्या हा घोडा जो आंघोळ घातल्यानंतर ओला झाल्यावर काळा दिसतो आणि वाळला की पांढरा दिसतो.शिवाय कागल मधील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म मांडण्यात आली आहे.ज्यात पांढरे रंगीबेरंगी,कबुतरे,ससे,मांजर,बदक,पांढरे उंदीर राजहंस,लवबर्ड,पोपट आदी जनावरे प्रदर्शनात आली आहेत. ब्ल्यू गोल्ड मकाऊ एक वर्षाचा आहे  जो प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.
       शिवाय कागल येथील हैदर भाई फार्म अमेरीकन १८ इंचाची बिल्टन बोकडे, टर्की कोंबडी बदक व्हाईट पीकॅन बदक, हेमस्टर जातीचे पांढरे उंदीर,हेज टॉग  पांढरा उंदीर,
टर्की कोंबडा,प्रदर्शनाचे ठरत आहे.    सातार्डेकरांचा साडेचार वर्षाचा सुंदर बैल, हसुर बुद्रुक येथील दिनकर शेळके यांचा निवर्गी वळू,गोल्डन कुत्रा, कोल्हापूरचा भुत्या घोडा, एक टनाचा २७ महिन्याचा पांडुरंग बोटे हसुर बुद्रुक यांचा 
एक टनाचा  कानाच्या पुढे वळलेल्या शिंगांचा जाफराबादि सुलतान रेडा, सुंदर बैल,एक टनाचा खुपिरे अमर आप्पाजी केंबळेकर यांचा भैरु रेडा
 २८ महिन्याचा कोतोलीकरांचा लाडका सोन्या बैल प्रदर्शनाचे ठरत आहेत आकर्षण.
       याचबरोबर विदेशी आणि स्वदेशी भाजीपाला हेरले येथील आदर्श चौगुले यांचा १०  किलोचा भोपळा १५ किलोचा कोहळा, सुरण, काटेरी केळफुल, ईश्वर फुल, माऊंटन पपई बेल वांग मागची  ढबू मिरची, कौलगेची शिमला मिरची, हळद कडगावचे बंपर फळ संकेश्वरी मिरची, १८ इंची लाल हिरवी मिरची, राधानगरी ठीकपुरलीची चेरी टोमॅटो अर्धा किलोचा बंपर, रानकेळी, राधानगरी येथील लाल केळी, दिंडनेर्ली करवीरची एकाच झाडाला चार किलो लागलेली हिरवी देशी  मिरची, तीन किलोचा भोपळा, २० किलो वजनाचा नागदेववाडी येथील प्रताप चिपळूणकर यांचा केळीचा घड,साडेचार फूट लांब  निशिगंध असलेले फुलाचे रोप सतेज कृषी 
प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे.लांब पपई आणि पाच किलो वजनाचा  मोठा कोबी,शिरोळ येथील हिरवीगार वांगी कारली. शिरोळ येथील तानाजी इंगळे यांची झुकिनी भाजी,वाकरे येथील विशाल जनार्दन पाटील यांचा अडीच किलो वजनाचा दुधी भोपळा, गगनबावडा तालुक्यातील मांडूकली खोपडेवाडी येथील पुनाखिरी म्हणजेच पुना काकडी,आदी भाज्या पहावयास मिळत आहेत. जरबेरा फुले निशिगंध प्रदर्शनाचे ठरत आहेत आकर्षण याचबरोबर विविध कँपन्यांची उत्पादने विविध प्रकारची ट्रॅकटर्स मांडण्यात आली आहेत हेही आकर्षण ठरत आहेत.
        स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास मिळत आहे.भाज्यांमध्ये  फळ,वांगी,टोमॅटो,शेंग,मिरची,दुधी भोपळा,मोठा भोपळा,हळद,धान्य,लसूण, शिरोळ कोंडीग्रे येथील हिरवी कारली, शिरोळ कुटवाड येथील काजल काकडी, विदेशी भाजीपाला मध्ये फायजिली सॅलरी, सॅमसंग, ब्रोकोली. अडीच फूट लांब अन्नपूर्णा पाने खास आकर्षण.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे  गोशाळा घन जीवामृत, ड्रॅगन फ्रुट, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, ठिबक सिंचन संच, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,प्लास्टिक अच्छादन, कीटकनाशके फवारताना कामगंध सापळा पक्षी थांबे रोपांत द्वारे ऊस लागवड, पौष्टिक तृणधान्याच्या पासून छत्रपती लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची रांगोळी साकारण्यात आली आहे.तसेच प्रदर्शनात पाचट व्यवस्थापन ए आय तंत्रज्ञानचा वापर करून स्मार्ट शेती उपयोग, ड्रोनद्वारे फवारणी सेंसरचा वापर कृत्रिम रेतन ए.आय किटचा वापर याबाबत प्रदर्शनात मार्गदर्शन होत आहे.सुपर के नर्सरी टेक्निक, फनी डोळा दोन रुपयांपासून ३० पैशांपर्यंत  खर्च कमी करून तंत्रज्ञान करणारे विकसित हे डेमो दाखवण्यात आले आहे, राधानगरी कृषी विभागांतर्गत एकात्मिक कीड व्यवस्थापनवर डेमो तयार करण्यात आला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना अंतर्गत शेतकऱ्यांचा अपघात झाला तर त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा याबाबत डेमो लावण्यात आलेला आहे शिवाय शेतामध्ये फवारणी करत असताना कोणती काळजी घ्यावी हाही डेमो दाखविण्यात आलेला आहे. शिवाय शेती कशी करावी याची माहिती दिली जात आहे.ही सर्व माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव भरविण्यात आला असून तांदळाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, आंबेमोहोर काळा जिरगा, कोलम, दप्तरी, इंद्रायणी,हात सडीचा अशा नमुन्यांचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे.ज्याची विक्री ही प्रचंड होत आहे.शिवाय राधानगरी येथील घरगुती हळद,व अन्य शेतकरी यांची हळद,मसाले,सेंद्रिय गूळ नाचणी,उडीद, विविध फळे पेरू,मध, जाम,काजू,बदाम,विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांची खरेदी शेतकरी व नागरिक मोठ्या प्रमाणात करत आहेत.याचबरोबर फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन)  बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश  असल्याने याठिकाणी पाहण्यासाठी खेळण्यासाठी गर्दी ही लहान मुलांसह आबालवृद्ध आणि शेतकरी करत आहेत.प्रदर्शनामध्ये खाद्य महोत्सव भरविण्यात आला असून याठिकाणी कोल्हापूरकर व शेतकरी आस्वाद घेत आहेत.खाद्य पदार्थांवर  ताव मारत आहेत.
      

गोकुळ, महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी, संजय घोडावत ग्रुप, चितळे डेअरी, यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे.त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग,आत्मा,पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद,पणन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खते कोल्हापूर संघटनेचे 
या प्रदर्शनासाठी संयोजक विनोद पाटील,सुनील काटकर,धीरज पाटील, जयवंत जगताप कृषी विज्ञान केंद्र तळसंदे,जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगिरे,डॉ.सुनील कराड विभागीय संशोधन संचालक,नामदेवराव परीट,  उपसंचालक कृषी  विभाग, डॉ.प्रमोद बाबर  पशु विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर,गोकुळचे हणमंत पाटील, डॉ.साळुंखे,युवराज पाटील तालुका कृषी अधिकारी, डी डी पाटील, महादेव नरके डी. वाय. पी.,स्काय स्टार इव्हेंट चे स्वप्नील सावंत आदींनी परिश्रम घेतले आहे.


तीन दिवसात झालेल्या स्पर्धा

प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्पस्पर्धा, खाद्य महोत्सव स्पर्धा,जनावरे गटनिहाय स्पर्धा या घेण्यात आल्या आहेत. याचबरोबर काही शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांची पशुस्पर्धांची निवड करण्यात आली आहे. त्यांना बक्षिसे आज होणाऱ्या समारोप समारंभात दिली जाणार आहेत.आज प्रदर्शन स्थळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट देऊन विविध उपकरणे,शेतीमाल पाहिला.आज तपोवन मैदानावर आज के.डी.सी. अकॅडमी प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम झाला.


सेंद्रिय गुळाला मागणी

प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात गुळाची विक्री झाली  सेंद्रिय गूळ खरेदी करण्यावर लोकांनी अधिक भर दिला  आहे.


सतेज कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात तीन दिवसात विक्री झालेला शेतमाल : 

१) सेंद्रीय गूळ : ३५०० kg
२) इंद्रायणी तांदूळ : ७००० kg 
३) आजरा घनसाळ : ९००० kg 
४) इंद्रायणी कणी : २५००  kg
५)  रत्नागिरी २४ :  ४०००  kg
६) सेंद्रीय हळद : १२०० kg  
७) नाचणी : १००० kg
८) विविध बी बियाणे २०००  kg


पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा "सतेज कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तुफान तुडुंब गर्दी प्रदर्शनाच्या तीन दिवसात ६ कोटीच्या आसपास उलाढाल
Total Views: 44