बातम्या
महावितरणमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय – संचालक पवार”
By nisha patil - 9/22/2025 2:50:36 PM
Share This News:
महावितरणमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय – संचालक पवार”
“नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिला कर्मचाऱ्यांशी विशेष संवाद”
महावितरणमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून तांत्रिक क्षेत्रात त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वतःला सिद्ध केले आहे. निसर्गाने दिलेली संवेदनशीलता व कल्पकतेचे गुण प्रशासन आणि ग्राहक सेवेत प्रभावी ठरत आहेत, असे गौरवोद्गार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी काढले.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर १९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर परिमंडलातील ‘विद्युत भवन’ येथे महिला कर्मचाऱ्यांशी त्यांनी विशेष संवाद साधला. या वेळी कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंता पूनम रोकडे, कार्यकारी अभियंते सुनील गवळी, म्हसू मिसाळ, दत्तात्रय भणगे, अजित अस्वले, अशोक जाधव, सुधाकर जाधव, सागर मारुळकर, निलेश चालिकवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
महावितरणमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय – संचालक पवार”
|