बातम्या

पन्हाळ्यातील मशिदीचे वादातील बांधकाम उतरविले. मुस्लिम समाजाने शासनाला केले सहकार्य. स्वतःहून बांधकाम हटविले.

The controversial construction of a mosque in Panhala was taken down


By nisha patil - 2/5/2026 12:44:34 PM
Share This News:



पन्हाळ्यातील मशिदीचे वादातील बांधकाम उतरविले. मुस्लिम समाजाने शासनाला केले सहकार्य. स्वतःहून बांधकाम हटविले.


पन्हाळा,प्रतिनिधी 
पन्हाळा येथील प्रार्थना स्थळ येथे बांधिले शौच्छालय व वाढीव वादातले जागेतली पत्राचे शेड हे ह. पीर शहादुद्दीन खत्तालवल्ली पन्हाळा ट्रस्टी यांनी स्वतःहून काढून घेतले. या पार्थनास्थळात पन्हाळ्यात मोहरम सण हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. या मोहरम सणात पीर-पंजांना निरोप देण्यासाठी या मशिदीच्या बाहेर हिंदू-मुस्लिम भाविकांची गर्दी होत असते .

 

यासाठी पावसाळ्यात भाविकांची व नमाज पठनाच्या वेळी गर्दी झाल्यास गैरसोय होऊ नये, यासाठी या मशिदीच्या पुढील बाजूस पत्र्याचे शेड मारण्यात आले. त्याचबरोबर स्वच्छतागृह बांधण्यात आले. पण हे बांधकाम सरकारी जागेत येत असल्याची तक्रार झाली. त्यानुसार जागेची मोजणी होऊन मशिदीचे बांधकाम हे वादाच्या भूमिकेत येत असल्याचे समोर आले. याबाबत  दर्गा अध्यक्ष यांना दिनांक,२/०४/२०२६ रोजी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 53 (1-अ) अन्वये नोटीस दिनांक ,०९/०४/२०२६ रोजी व ११:०० , वाजता मा. तहसील कार्यालय पन्हाळा या ठिकाणी सर्व समाजातील प्रतिष्ठित स्थानिक नागरिक यांना तहसील कार्यालय या ठिकाणी बोलवण्यात आले होते. मा. प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षखाली मीटिंग चे नियोजन करण्यात आले होते. यावेळी मीटिंगसाठी मुख्याधिकारी नगरपरिषद पन्हाळा, भूमीउपअधीक्षक पन्हाळा, तहसीलदार पन्हाळा,पोलीस निरीक्षक पन्हाळा, यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली.त्या बैठकीमध्ये जे महसूल व भूमी अभिलेख यांनी ज्या सूचना दिल्या होत्या वाढीव वादातील क्षेत्र आहे.ते स्वतः येऊन अधिकाऱ्यांनी दाखवले होते.

 

जे वादाच्या जागेमध्ये असणारे क्षेत्र व त्यावरचे असणारे शौच्छालय पत्रा शेड हे स्वतः सर्व समाजाच्या वतीने संगत मताने ह. पीर शहादुद्दीन खत्तालवल्ली पन्हाळा ट्रस्टी काल रात्रीपासून काढून घेण्यात सुरुवात करण्यात आली आहे.त्यामुळे जे वादातील क्षेत्र होते ते रिकामा झाला. या कार्याला पन्हाळ्यातील हिंदू समाजाने देखील पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्हाळ्यातील हिंदू-मुस्लिम मावळ्यांनी एकतेचा व समतेचा संदेश या कृतीतून दिला आहे.


पन्हाळ्यातील मशिदीचे वादातील बांधकाम उतरविले. मुस्लिम समाजाने शासनाला केले सहकार्य. स्वतःहून बांधकाम हटविले.
Total Views: 9