बातम्या
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हद्दवाढीचा निर्णय –
By Administrator - 6/18/2025 3:47:31 PM
Share This News:
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हद्दवाढीचा निर्णय –
हद्दवाढ विरोधी कृती समितीचा आरोप
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीस मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. मात्र या निर्णयाला विरोधाची झळ येताना दिसत आहे. हद्दवाढ विरोधी कृती समितीने याला तीव्र विरोध दर्शवत, हा निर्णय केवळ नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचा आरोप केला आहे.
कृती समितीचे समन्वयक सचिन चौगुले व उत्तम आंबवडेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "हा निर्णय म्हणजे राजकीय स्टंटबाजी असून, सरकारचा हा दुटप्पीपणा आहे. वीस गावांचा या हद्दवाढीला स्पष्ट विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत हद्द वाढ होऊ देणार नाही. आणि जबरदस्तीने निर्णय लादल्यास आम्ही न्यायालयात लढाई लढू."असा इशारा देण्यात आलाय.
दरम्यान या पार्श्वभूमीवर हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हद्दवाढीचा निर्णय –
|