ताज्या बातम्या
कै. राजेंद्र मोरे (बापू) यांच्या निधनाने सहकार क्षेत्रावर शोककळा
By nisha patil - 6/1/2026 3:30:51 PM
Share This News:
गोकुळ दूध संघ व बिद्री साखर कारखान्याचे संचालक कै. राजेंद्र कृष्णाजी मोरे (बापू) यांच्या दु:खद निधनाने सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष मा. हसन मुश्रीफ यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन मोरे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मनोजभाऊ फराकटे, ग्रामस्थ व कुटुंबीय उपस्थित होते. कै. मोरे यांचे सहकार क्षेत्रातील योगदान यावेळी श्रद्धेने स्मरणात ठेवण्यात आले.
कै. राजेंद्र मोरे (बापू) यांच्या निधनाने सहकार क्षेत्रावर शोककळा
|