बातम्या
शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार
By nisha patil - 2/5/2025 9:54:20 PM
Share This News:
शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार
कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शक्तीपीठबाधित शेतकऱ्यांची बैठक शुक्रवारी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत अजिंक्यतारा कार्यालयात झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. १२ जिल्ह्यातील बाधीत शेतकरी या बैठकीत सहभागी होणार असून आहेत. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी शासनाकडून पोलीस यंत्रणेमार्फत वारंवार दबाव सुरु आहे. याला तीव्र विरोध करण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी यावेळी केला. यावेळी उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, गोकुळ दुध संघाचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, भुदरगड कॉंग्रेस नेते राहूल देसाई, सम्राट मोरे (गारगोटी) , सुयोग वाडकर, कृष्णात पाटील (साजणी), संपत देसाई, युवराज शेटे (माणगाव), शिवाजी पाटील ( खेबवडे), आनंदा पाटील ( एंकोडी), युवराज पाटील ( कणेरी), तानाजी भोसले (कणेरीवाडी) , शिवाजी कांबळे( निमशिरगाव) , एस. एन. पाटील, संग्राम पडोणकर आदी उपस्थित होते.
शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार
|