बातम्या

कोल्हापूरच्या २७८ शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणार!

The educational standard of 278 schools in Kolhapur will be improved


By nisha patil - 11/23/2026 11:00:09 PM
Share This News:



कोल्हापूरच्या २७८ शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणार!

 सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी आणणार – आमदार राजेश क्षीरसागर यांची ग्वाही

कोल्हापूर, दि. २३ : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्याचे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती शिला सोनुले यांच्या कार्यालयीन प्रवेश सोहळ्यात त्यांनी २७८ प्राथमिक शाळांच्या भौतिक सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार सभापती शिला सोनुले यांनी व्यक्त केला. यावेळी महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, परिवहन सभापती सत्यजित जाधव, सभागृहनेते मुरलीधर जाधव, गटनेते शारंगधर देशमुख आणि आदिल फरास उपस्थित होते. तसेच संजय मोहिते, अनुराधा खेडकर, वैभव कुंभार, संगीता सावंत, सुरेखा ओटवकर, विजयसिंह खाडे-पाटील, दिपा काटकर, दिपा ठाणेकर, पूजा पोवार, ऋतुराज क्षीरसागर, स्वरुप कदम, पल्लवी देसाई, माधुरी व्हटकर, जयश्री चव्हाण, डॉ. सुषमा जरग, स्वाती कांबळे आणि विनायक कारंडे यांची उपस्थिती होती. उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, रसुल पाटील, विजय माळी, बाळासाहेब कांबळे, अजय गोसावी, संजय शिंदे, जगदिश ठोंबरे, जयश्री हंकारे, आसमा मुलाणी, राजाराम शिंदे आणि शांताराम सुतार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आता निधीच्या ग्वाहीचे प्रत्यक्ष विकासकामांत रूपांतर किती वेगाने होते आणि कोल्हापूरच्या महापालिका शाळांचा शैक्षणिक चेहरामोहरा कसा बदलतो, याकडे लक्ष लागले आहे.


कोल्हापूरच्या २७८ शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणार!
Total Views: 1