बातम्या
"एक गाव – एक गणपती" परंपरेत जय शिवराय व्यायाम तालीम मंडळाचा उत्साह
By nisha patil - 8/28/2025 5:32:24 PM
Share This News:
"एक गाव – एक गणपती" परंपरेत जय शिवराय व्यायाम तालीम मंडळाचा उत्साह
गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त सावर्डे दुमाला (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील जय शिवराय व्यायाम तालीम मंडळा तर्फे भाविकांना व ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या वर्षीची श्रींची मूर्ती श्री. महादेव शा. भोसले व श्री. सुधीर म. कारंडे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष श्री. विलास गो. कारंडे, उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय भ. कारंडे, खजिनदार श्री. प्रशांत शि. जाधव यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
गेली 30 वर्षे "एक गाव – एक गणपती" ही परंपरा गावाने जपली असून, हा गणेशोत्सव डॉल्बी मुक्त पद्धतीने पारंपारिक वाद्य, गायन व भजन यांच्या माध्यमातून साजरा केला जातो.
गावातील सर्व मंडळे व ग्रामस्थ दररोज एकत्र येऊन आरती व प्रसाद करतात, तसेच उत्सवाच्या निमित्ताने सामूहिक महाप्रसादाचे आयोजन केले जाते. विविध मंडळे असूनही गणेशोत्सवाच्या काळात गावकरी एकत्र येऊन "एक गाव – एक गणपती" या संकल्पनेला बळकटी देतात.
या उपक्रमामुळे गावात ऐक्य, परंपरा आणि सामाजिक बंधुभावाचे दर्शन घडते.
"एक गाव – एक गणपती" परंपरेत जय शिवराय व्यायाम तालीम मंडळाचा उत्साह
|