राजकीय
चंदगडमध्ये राजर्षि शाहू आघाडीचा उत्साह...
By nisha patil - 4/12/2025 1:33:09 PM
Share This News:
चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या आढावा बैठकीत राजर्षि शाहू आघाडीची संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह स्पष्टपणे जाणवला. माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या नंदिनी बाभुळकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील व विक्रम चव्हाण-पाटील यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय रणनीती, मतदार संपर्क आणि विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
मंत्री हसनसो मुश्रीफ, सतेज पाटील आणि राजेश पाटील यांच्या माध्यमातून चंदगडला मिळालेल्या प्राधान्यकृत प्रकल्पांची उजळणी करताना, चंदगडच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षि शाहू आघाडीच सक्षम पर्याय असल्याचे नेत्यांनी ठळक केले.
चंदगडमध्ये राजर्षि शाहू आघाडीचा उत्साह...
|