बातम्या
आंदोलन अंकुश संघटनेच्या लढ्यास यश बंधारा बाधित शेतकऱ्यांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई
By Administrator - 4/4/2026 3:31:37 PM
Share This News:
आंदोलन अंकुश संघटनेच्या लढ्यास यश बंधारा बाधित शेतकऱ्यांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई
शिरोळ तालुक्यामध्ये गेली दोन वर्षापासून म्हैशाळ जुन्या बंधांर्याच्या जागी बैरेज उभारण्याचं काम सुरू आहे. सदर कामासाठी ठेकेदाराने नदीत बांध घातल्यामुळे कनवाड हद्दीतील सुमारे 25 शेतकऱ्यांची 3.78 हे.आर इतकी जमीन वाहून गेली होती. त्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, जमिनीस संरक्षक बांध घातला पाहिजे, बैरेजच्या कामामध्ये जाणार्या जमिनीचे भूसंपादन होऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळावा तसेच शिरोळ तालुक्यातील खालील गावांना उन्हाळ्यामध्ये स्वच्छ पाणी मिळण्यासाठी धरणामध्ये राखीव साठा असावा या सर्व मागण्याबाबत गेली पंधरा दिवस आंदोलन अंकुश संघटनेकडून ठिय्या आंदोलन करत कणवाड हद्दीतील ठेकेदाराचे काम बंद पाडलेलं होतं.
यामध्ये गेल्या आठवड्यात ठरल्याप्रमाणे आज शिरोळचे तहसीलदार महेश खिल्लारी साहेब यांनी बैठक आयोजित केली होती. चर्चेमध्ये पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई द्यावी आणि भूसंपादन तात्काळ कराव आणि मगच काम सुरू करा असा शेतकऱ्यांनी पवित्रा घेतला.
यावेळी पाटबंधारे अधिकारी आणि आंदोलक यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली पण तहसीलदारांनी परिस्थिती हातळली. यावेळी चर्चेअंती शेतकऱ्यांचा सातबारा कायम ठेवत एकूण 3.78 हे.आर इतक्या जमिनीस पन्नास लाख रुपये पंचनामे नुसार सर्व शेतकऱ्यांच्या मध्ये विभागून दोन टप्प्यांमध्ये देण्याचे ठरले . तसेच उत्खननात निघणारी दगड माती वाहून गेलेल्या जमिनीमध्ये भर घालण्याचे ठरले .
जमिन परत वाहून जाऊ नये यासाठी संरक्षक बांध घालण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवण्याचे ठरले तसेच भूसंपादनाच्या बाबतीत प्राथमिक मोजणी झालेलीआहे एक महिन्यांमध्ये अंतिम मोजणी करून प्रस्ताव भूसंपादन प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे पाठवण्याची ठरले.
बैठकीस पाटबंधारे चे कार्यकारी अभियंता रोहित कोरे, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन चे एमडी केसकरसो तसेच आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चूडमुंगे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे कृष्णा गावडे, वजीदअली इनामदार , अमोल गावडे, मोहम्मद इनामदार, मंगेश नलावडे, इर्षाद इनामदार,संभाजी जाधव, सत्तार पाटील, राहुल माने खलिल इनामदार इ. शेतकरी उपस्थित होते

आंदोलन अंकुश संघटनेच्या लढ्यास यश बंधारा बाधित शेतकऱ्यांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई
|