राजकीय

मुंबईत भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळा संपन्न

The foundation stone laying ceremony of BJP


By nisha patil - 10/29/2025 12:26:06 PM
Share This News:



भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रमुख उपस्थित होते.

या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आमदार अमितजी साटम, सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार, तसेच रावसाहेब दानवे, विविध खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भूमिपूजन सोहळ्याने भाजपच्या संघटनात्मक बळकटीचा आणि राज्यातील पक्षाच्या सशक्त उपस्थितीचा ठसा उमटवला.


मुंबईत भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळा संपन्न
Total Views: 44