बातम्या

उपोषणकर्त्यांच्या जीवाला धोका झाला तर सरकार जबाबदार” – धनगर समाज

The government is responsible


By nisha patil - 9/25/2025 12:50:43 PM
Share This News:



उपोषणकर्त्यांच्या जीवाला धोका झाला तर सरकार जबाबदार” – धनगर समाज

 ST आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन

धनगर समाजाच्या (ST) आरक्षणासाठी सुरू असलेल्या दिपक बोऱ्हाडे यांच्या जालन्यातील आमरण उपोषणाला कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाने पाठींबा दर्शविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण झालेले नसल्याचा आरोप करत समाजाने दोन दिवसांत आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

दि. १७ सप्टेंबरपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, जालना येथे दिपक बोऱ्हाडे यांनी उपोषणास सुरुवात केली असून, आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. मात्र, अद्याप सरकारकडून दखल घेतलेली नाही. “जर बोऱ्हाडे यांच्या जीवितास काही अनिष्ट घडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील,” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.


उपोषणकर्त्यांच्या जीवाला धोका झाला तर सरकार जबाबदार” – धनगर समाज
Total Views: 84