विशेष बातम्या
The grand buildings of Sarathi Sub...कोल्हापुरात सारथी उपकेंद्राच्या भव्य इमारतींचे मार्च 2026 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
By nisha patil - 12/7/2025 9:31:31 PM
Share This News:
कोल्हापुरात सारथी उपकेंद्राच्या भव्य इमारतींचे मार्च 2026 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
▪️ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची पाहणी; दर्जेदार व जलद कामांचे निर्देश
राजाराम महाविद्यालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या सारथी उपकेंद्राच्या भव्य इमारतींचे लोकार्पण मार्च 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
.%5B1%5D.jpg)
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी इमारतींची पाहणी करून कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.सुमारे 176 कोटींचा निधी मंजूर असून कार्यालयीन इमारत, अभ्यासिका, वसतीगृहे, संग्रहालय, ग्रंथालय यांचा समावेश आहे.
सारथीच्या योजना –
▪️ कौशल्य विकास प्रशिक्षण
▪️ स्पर्धा परीक्षा तयारी
▪️ परदेश व राजाराम महाराज शिष्यवृत्ती
▪️ संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती
2024-25 मध्ये 86 कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.
तालुकास्तरावर शिबिरे, मेळावे घेऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
The grand buildings of Sarathi Sub...कोल्हापुरात सारथी उपकेंद्राच्या भव्य इमारतींचे मार्च 2026 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
|