बातम्या
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात भव्य "जनसुराज्य - महायुती दहिहंडी उत्सव"
By nisha patil - 8/21/2025 2:40:28 PM
Share This News:
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात भव्य "जनसुराज्य - महायुती दहिहंडी उत्सव"
मिरज : पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भव्य जनसुराज्य - महायुती दहिहंडी उत्सव यंदा दणक्यात साजरा होणार आहे.शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५ वाजता मिरज-पंढरपूर रोडवरील शासकीय मेडिकल कॉलेज समोरील खुल्या मैदानावर या दहिहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या दहिहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे, हा उत्सव ऑपरेशन सिंदूरच्या शौर्यगाथेला समर्पित आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर-वीरांगनांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम घेण्यात येत असून, गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल १,५५,९९९ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अभिनेत्री निकिता दत्ता, सई मांजरेकर आणि सान्वी यांची विशेष उपस्थिती.
संध्याकाळी ६ वाजता सोहळ्याची सुरुवात होणार असून, मिरजकरांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात भव्य "जनसुराज्य - महायुती दहिहंडी उत्सव"
|