बातम्या

पी.एमश्री.उर्दू मराठी विद्यामंदिरचे उत्तुंग व उज्वल यश

The great and bright success of PMShriUrdu Marathi Vidyamandir


By Administrator - 6/4/2026 12:08:40 PM
Share This News:



पी.एमश्री.उर्दू मराठी विद्यामंदिरचे उत्तुंग व उज्वल यश
 

आजरा (हसन तकीलदार ):-जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत घेण्यात आलेल्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा 2025-26 मध्ये पीएमश्री उर्दू मराठी विद्यामंदिर, आजरा या शाळेने दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
   

 या प्रज्ञाशोध परीक्षेत कु. बरीरा समीर खेडेकर हिने 300 पैकी 236 गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला तर कु.जिया इम्रान लमतुरे  हिने 300 पैकी 206 गुण मिळवून चार तालुक्यात (आजरा,गड,कागल,चंदगड)तृतीय क्रमांक मिळवून शाळेचे, पालकांचे आणि आजरा परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. 
 

त्याचप्रमाणे इतर गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत कु. सिदरा नईम मुराद.,कु. निदा अमीन बेपारी, कु. फिजा मुझम्मील लमतूरे,कु. मुफिजा मुजीब मुराद,कु. सारा सद्दाम नेसरीकर,कु. आयेशा अनिस नाईकवाडे,कु.अर्श महमदरसूल दिडबाग,कु.रेहान इसाक शेख. या उल्लेखनीय यशाबद्दल पंचक्रोशीत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

या विद्यार्थ्यांना रिजवान माणगावकर, सौ. परवीन लाटकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तर बसवराज गुरव (गट शिक्षण अधिकारी आजरा),सौ. रत्नप्रभा दबडे.(विस्तार अधिकारी जि.प.कोल्हापूर),रियाज चौगले    (उर्दू केंद्र प्रमुख ),रावसाहेब देसाई (केंद्र प्रमुख आजरा),युनूस लाडजी.(मुख्याध्यापक उर्दू मराठी विद्यामंदिर आजरा)यांची प्रेरणा लाभली
 

विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शाळा व्यवस्थपन समिती पीएमश्री उर्दू मराठी विद्यामंदिर, आजरा तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.


पी.एमश्री.उर्दू मराठी विद्यामंदिरचे उत्तुंग व उज्वल यश
Total Views: 199