बातम्या
दुष्काळाचा भीषण चेहरा! इस्पुर्लीच्या तलावातील गणेशमूर्ती उघड्यावर
By nisha patil - 10/17/2026 4:22:46 PM
Share This News:
दुष्काळाचा भीषण चेहरा! इस्पुर्लीच्या तलावातील गणेशमूर्ती उघड्यावर
यंदाच्या दुष्काळाचे भीषण परिणाम आता जलस्रोतांवरही दिसू लागले आहेत. करवीर तालुक्यातील इस्पुर्ली येथील तलावात पाण्याअभावी अनेक गणेशमूर्ती उघड्यावर पडल्याचे चित्र समोर आले आहे. एकेकाळी पाण्याने भरलेला हा तलाव आता कोरडा पडल्याने तलावातील गणेशमूर्ती उघड्यावर दिसत आहेत.
गणेशोत्सवात भक्तिभावाने विसर्जित केलेल्या या गणेशमूर्ती पाण्याअभावी उघड्यावर पडल्याचे दृश्य मनाला चटका लावणारे आहे. २०२६ मधील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता या चित्रातून अधोरेखित होत आहे. पावसाचे घटलेले प्रमाण, आटत चाललेले जलस्रोत आणि पाण्याची कमतरता यामुळे परिसरातील परिस्थितीकडे लक्ष वेधले जात आहे.
या तलावातील गणेशमूर्तींची योग्य ती व्यवस्था करावी, तसेच तलाव परिसराची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दुष्काळाची दाहकता केवळ पाण्याच्या टंचाईपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर त्याचे परिणाम आता श्रद्धेच्या प्रतीकांवरही दिसू लागले आहेत.
दुष्काळाचा भीषण चेहरा! इस्पुर्लीच्या तलावातील गणेशमूर्ती उघड्यावर
|