बातम्या
आजरा युथ कव्हरेजचे आदर्श आणि उल्लेखनीय कार्य
By Administrator - 2/23/2026 6:01:53 PM
Share This News:
आजरा युथ कव्हरेजचे आदर्श आणि उल्लेखनीय कार्य
आजरा (हसन तकीलदार)*:-आजरा यूथ कव्हरेज फाउंडेशनचे शिक्षण, वैद्यकीय व सामाजिक सेवेसाठी तरुणांचा उपक्रम उल्लेखनीय आणि अनुकरणीय आहे.आजरा येथील शिक्षित तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेली “आजरा यूथ कव्हरेज फाउंडेशन गेल्या दोन वर्षांपासून समाजासाठी विविध उपक्रम राबवत आहे. गरीब व गरजू लोकांना मदत करणे आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे.
फाउंडेशनचे ध्येय म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, त्यांना आवश्यक शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देणे तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना मदतीचा हात देणे. अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक फी सहाय्य व मार्गदर्शन देण्यात येत आहे. तसेच सैन्यदल व स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात काम करीत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातही फाउंडेशनने महत्त्वपूर्ण काम केले आहे. गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत, औषधोपचारासाठी सहाय्य व इतर वैद्यकीय गरजांसाठी मदत करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना कठीण काळात आधार मिळाला आहे.
सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने रमजान महिन्यात गरजू कुटुंबांना घरगुती जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले. तांदूळ, डाळी, तेल, साखर व इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या या किटमुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.
“शिक्षण, वैद्यकीय मदत आणि समाजसेवा” या तिन्ही क्षेत्रांत कार्य करत आजरा यूथ कव्हरेजने अल्पावधीतच आजरा परिसरात आपली ओळख निर्माण केली आहे. तरुणांनी उभारलेली ही संस्था पुढील काळातही समाजातील गरजू लोकांसाठी सेवा कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत आहे.बुरहान शेख,मुआज काकतीकर,नियाज हसन तकीलदार,अजीम लमतुरे,सुजल कांबळे,दिनेश कालेकर,सुमित सुतार,भूषण कांबळे,नोमान शेख,आफताब लाडजी,मुआज नेसरीकर,जुबेर बागवान,मुफिद काकतीकर,बुरहान खेडेकर,मुसेब इंचनाळकर,आकीब भडगावकर,अरमान लमतुरे यांचा सहभाग मोलाचा आहे.युवकांच्या या आदर्शवत कार्याची दखल घेतली जात आहे आणि या युवकांचे कौतुक होत आहे.
आजरा युथ कव्हरेजचे आदर्श आणि उल्लेखनीय कार्य
|