शैक्षणिक
इचलकरंजी मध्ये ‘दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज’ चे उदघाटन भव्य आणि थाटामाटात संपन्न
By nisha patil - 7/31/2025 12:05:24 PM
Share This News:
इचलकरंजी मध्ये ‘दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज’ चे उदघाटन भव्य आणि थाटामाटात संपन्न
मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे
माजी खासदार निवेदिता माने, यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन
इचलकरंजी : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे इचलकरंजी शहरातील पहिल्या दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचे उदघाटन संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मंत्री मा.प्रकाशआण्णा आवाडे, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने (वहिनी) यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य आणि थाटामाटात संपन्न झाले. उदघाटन समारंभास संस्थेच्या सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ शुभांगी गावडे, संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य सिताराम गवळी, संस्थेचे सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे, संस्थेचे कोल्हापूर जिल्हा विभागप्रमुख मा.श्रीराम साळुंखे इचलकरंजी बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲङ. रामकृष्ण् तोष्णीवाल, बार कौन्सिल महाराष्ट्र गोवा चे माजी चेअरमन ॲङ. विवेक घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे यांनी आपल्या मनोगतात माझ्या जडणघडणीत डी.के.ए.एस.सी.कॉलेजचे योगदान मोठे आहे. माझ्यातील नेतृत्वगुणांचा विकास याच महाविद्यालयातील व्यासपीठावरुन झाला आहे. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजींच्या शिक्षण विचारात दूरदृष्टी असलेली दिसते. मळलेली वाट न निवडता स्वत:ची स्वतंत्र वाट निर्माण करण्याचे धाडस आणि बळ या महाविद्यालयाने दिले असून बदलत्या शिक्षणप्रवाहात विधी महाविद्यालयाची स्थापना करुन संस्थेने ज्ञानशिदोरीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे. असे प्रतिपादन केले.
दुसऱ्या प्रमुख पाहुण्या माजी खासदार निवेदिता माने यांनी आपल्या मनोगतात इचलकरंजी शहरात दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजची स्थापना ही इचलकरंजी शहराच्या शैक्षणिक विकासाची नांदी आहे. या कॉलेजच्या माध्यमातून येथील गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना कायदयाचे ज्ञान मिळणार असून नामवंत वकील व न्यायाधीश निर्माण होतील व ते आपल्या शहराचा नावलौकिक वाढवतील असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांनी पारंपारिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक महाविद्यालये स्थापन करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. हे व्यावसायिक कौशल्य् या विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळेल. समाजाला उध्वस्त् होण्यापासून वाचविण्यासाठी कायद्याचे ज्ञान असणारे विद्यार्थी घडविणे गरजेचे आहे. असे विद्यार्थी या लॉ कॉलेजच्या माध्यमातून निर्माण होतील आणि शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचा शैक्षणिक विचार आत्मसात करुन सुसंस्कारी वकील, न्यायाधीश निर्माण होतील असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी ॲङ रामकृष्ण् तोष्णीवाल, ॲङ. विवेक घाटगे, मा. श्रीराम साळुंखे यांनी मनोगते मांडली. याचवेळी विधी महाविद्यालयाच्या स्थापनेत महत्व् पूर्ण योगदान देणाऱ्या श्री हितेंद्र साळुंखे, ॲङ. हितेश राणिंगा, प्राचार्या ॲङ. बागडी मॅडम, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार , प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्राचार्य डॉ एस एम मणेर, प्राचार्य डॉ एस के खाडे, प्राचार्य डॉ अनिल पाटील, प्राचार्य विरेन भिर्डी, श्री अमित आव्हाड, प्रा मयुर बोरगे, ॲड.तौफिक नायकवडे, श्री अजित भोसले, प्रा.अजहर दाडीवाले, प्रा चेतन पाटील , श्री बी आर पाटील , श्री रमेश रावण, रिटा रॉड्रिक्स् इत्यादींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे सीईओ मा.कौस्तुभ गावडे यांनी लॉ कॉलेजच्या स्थापनेमागील उद्देश व विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या संधी विशद केल्या. समारंभाचे आभार संस्थेच्या सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ शुभांगी मुरलीधर गावडे यांनी मानले. तर सुत्रसंचालन प्रा डॉ अतिश पाटील यांनी केले. या उदघाटन सोहळयास जिल्हा बार असोसिएशनचे ॲङ. मनोज पाटील, ॲड. अमित सिंग, ॲड. इंद्रजित चव्हाण, मा. गणबावले, ॲड. शाहू काटकर तसेच संस्थेचे आजी माजी आजीव सेवक, पदाधिकारी, विविध शाखांचे शाखाप्रमुख, गुरुदेव कार्यकर्ते, इचलकरंजीतील प्रतिष्ठित मान्य्वर , पत्रकार, छायाचित्रकार, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
इचलकरंजी मध्ये ‘दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज’ चे उदघाटन भव्य आणि थाटामाटात संपन्न
|