बातम्या

केंद्रशाळा पाचगाव येथे पिंक रूमचे उद्घाटन संपन्न! 

The inauguration of the Pink Room


By Administrator - 3/13/2026 3:14:21 PM
Share This News:



केंद्रशाळा पाचगाव येथे पिंक रूमचे उद्घाटन संपन्न! 
 

मलकापूर प्रतिनिधी दि.१०-३-२०२६ केंद्रशाळा पाचगाव तालुका करवीर येथे मा . सीईओ साहेंबाचा विशेष उपक्रम म्हणजे पिंकरूम चे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले . 
 

 शाळेतील किशोरवयीन मुलींसाठी खास तयार केलेल्या पिकंरूम चे उद्घाटन पाचगावच्या लोकनियुक्त सरपंच मा .प्रियांका  पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले . किशोरवयीन मुलींच्या अडचणीच्या वेळी त्यांना आराम करता यावा यासाठी या पिंक रूमची निर्मिती केली आहे . यामुळे मुलींच्या समस्या दूर  मुलींच्या समस्या दूर होण्यास मदत होणार आहे .
 

या पिंक रूममध्ये सॅनिटरी पॅड ,वेडिंग मशीन सॅनिटरी पॅड, डिस्पोजेबल मशीन, आणि रुग्णासाठी आरामासाठी बेड इत्यादी साधने ठेवण्यात आली आहेत . या पिंक रूमच्या उद्घाटना वेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य मा . संग्राम पाटील ,उपसरपंच दिपाली गाडगीळ शाळा समिती अध्यक्ष ,सातापा पाटील उपाध्यक्ष ,रणजीत व्हरगे, ग्रामपंचायत सदस्या रोमा नलवडे , स्वरा गाडगीळ ,  याज्ञसेनी पाटील , सदस्य अतुल गवळी  संजय शिंदे ,सचिन पाटील ,  पोहाळकर, शांताराम पाटील  तसेच  नारायण गाडगीळ, चंद्रकांत कांडेकरी, शिवाजी इरळेकर ,सागर इरळेकर ग्रामविकास अधिकारी राणे यांच्या बरोबर शिक्षिका  सीमा चव्हाण, सुनिता सुतार, रेखा व्हटकर, विजयमाला माळी, विशाल काटकर, आदी उपस्थित होते .
 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी केले . तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ . श्री  संजय जगताप सर यांनी केले .  तर सर्वांचे आभार सौ . सुनिता सुतार यांनी मानले.


केंद्रशाळा पाचगाव येथे पिंक रूमचे उद्घाटन संपन्न! 
Total Views: 12