ताज्या बातम्या
केनवडे फाटा येथे श्री स्वामी समर्थ श्रमिक बांधकाम कामगार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
By nisha patil - 2/1/2026 12:57:19 PM
Share This News:
केनवडे फाटा येथे श्री स्वामी समर्थ श्रमिक बांधकाम कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील श्रमिक व बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजना व सुविधांचा थेट लाभ मिळणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी गोरबे येथील विष्णू आण्णा गायकवाड, प्रविण वास्कर गोरबे, संजय चिदगे, सावर्डे बुद्रुकचे सरपंच विनोद कुमार कांबळे, उपसरपंच राजाराम तळेकर, केनवडेचे धोंडीराम एकशिगे, वाय. एम. पोवार (व्हनाळी), दिपक जोग (राशिवडे), तानाजी कांबळे (ठिपकुर्ली), धिरजकुमार कांबळे (सावर्डे बुद्रुक), नंदकुमार विधाते (ग्रामपंचायत सदस्य, सावर्डे बुद्रुक) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. श्रावण कांबळे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ऑपरेटर सानिका कांबळे यांचीही उपस्थिती होती.
या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी नोंदणी, नूतनीकरण, शिष्यवृत्ती योजना, कौशल्य विकास योजना, घरकुल योजना, वैद्यकीय मदत (मेडिकल क्लेम) यासह विविध शासकीय योजनांचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांना संघटनेमार्फत घेता येणार आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील श्रमिक वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या हक्कांसाठी संघटना प्रभावीपणे कार्य करणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
केनवडे फाटा येथे श्री स्वामी समर्थ श्रमिक बांधकाम कामगार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
|