बातम्या
कारागृहातील कैद्यांसाठी सर्वोदय मंडळांनी राबवलेला उपक्रम ठरला कौतुकास्पद...
By nisha patil - 11/10/2025 5:29:13 PM
Share This News:
कारागृहातील कैद्यांसाठी सर्वोदय मंडळांनी राबवलेला उपक्रम ठरला कौतुकास्पद...
चौक कारागृहात गांधी शांती परीक्षा व बक्षीस वितरण समारंभ संपन्न...
बिंदू चौक येथील सब जेलमध्ये मुंबई सर्वोदय मंडळाच्या सहकार्याने गांधी शांती परीक्षा व बक्षीस वितरण समारंभ यशस्वीपणे संपन्न झाला. या उपक्रमाचा उद्देश कैद्यांच्या जीवनात गांधीजींच्या विचारांचा प्रभाव निर्माण करून त्यांना सुधारण्यासाठी प्रेरणा देणे होता. यासाठी सब जेलचे अधीक्षक चंद्रकांत जठार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात पाचवी ते ग्रॅज्युएशन कॅटेगरीतील कैद्यांनी गांधी शांती परीक्षा दिली. कैद्यांनी परिपूर्ण अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. कैद्यांनी आपले अनुभव सांगितले की, गांधीजींचे विचार वाचले असते तर त्यांचे चुकीचे निर्णय टळले असते. भिकाजी मगदूम यांनी गांधी विचारांवर केलेले व्याख्यान कैद्यांच्या मानसिकतेत बदल घडविण्यास प्रेरक ठरले. यावेळी त्यांनी या व्याख्यानामध्ये गांधीजींच्या जीवनामध्ये अनेक प्रसंगांचे वर्णन करत कैद्यांना व उपस्थित त्यांनि मंत्रमुग्ध केले. यावेळी अभ्यास व्यक्तिमत्व पाठक सर यांचे या परीक्षेसाठी मोलाचे सहकार्य लाभले
कार्यक्रमात तारा न्यूज एमडी कल्पिता कुंभार, कार्यकारी संपादिका सुनंदा नाईक तसेच सर्वोदय मंडळाचे भीमराव कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने कारागृहातील कैद्यांच्या आयुष्यात बदलाव आणणाऱ्या ठरेल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी सचिन सुतार, भिकाजी मगदूम आणि ज्येष्ठ अभ्यासक पाठक सर यांच्या संयुक्त हस्ते कैद्यांना प्रमाणपत्रे आणि बक्षिसे वितरित करण्यात आली.
कारागृहाचे पोलीस अधीक्षक चंद्रकांत जठार यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. त्यांनी कैद्यांच्या विचारसरणीत सुधारणा घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
यावेळी कारागृहातील कैद्यांनी सांगितले की, जेलमध्ये राहून त्यांचे वर्तन बदलले आहे आणि गांधी विचार त्यांच्या दैनंदिन जीवनात लागू होत आहेत. प्रशासनाने अशा प्रेरक कार्यक्रमांचे आयोजन सुरू ठेवले तर कारागृहातील वातावरण सुधारेल आणि कैद्यांच्या सामाजिक व मानसिक विकासाला हातभार लागेल. असे वक्तव्य हे काही कैद्यांनी त्यांनी व्यक्त केले.
कारागृहातील कैद्यांसाठी सर्वोदय मंडळांनी राबवलेला उपक्रम ठरला कौतुकास्पद...
|