बातम्या
७६ वर्षीय केरू बळु बच्चे (नाना) यांचे प्रेरणादायी कार्य
By nisha patil - 9/21/2025 9:50:38 PM
Share This News:
७६ वर्षीय केरू बळु बच्चे (नाना) यांचे प्रेरणादायी कार्य
बच्चे सावर्डे येथे स्वच्छतेचा सामाजिक उपक्रम
बच्चे सावर्डे (प्रतिनिधी – किशोर जासूद) : पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे गावातील ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक केरू बळु बच्चे (नाना) हे वयाच्या उत्तरार्धातही समाजसेवेचे कार्य करत असून तरुण पिढीसाठी आदर्श ठरत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते रोज सकाळी एस. टी. स्टँड परिसरात दोन तास स्वच्छता करत आहेत.
दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत ते झाडू घेऊन परिसर स्वच्छ ठेवतात. प्रवाशांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळावे तसेच गावाचे नाव स्वच्छतेबाबत पुढे यावे या हेतूने त्यांनी हा उपक्रम सुरू केला.
“स्वच्छता हीच सेवा” हा संदेश नाना यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे, असे ग्रामस्थ सांगतात. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे गावात स्वच्छतेबाबत जागरूकता वाढत असून स्थानिक युवकांनाही प्रेरणा मिळत आहे.
समाजसेवेच्या क्षेत्रात वय अडथळा नसतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे केरू बळु बच्चे (नाना). त्यांचा उपक्रम केवळ गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
७६ वर्षीय केरू बळु बच्चे (नाना) यांचे प्रेरणादायी कार्य
|