बातम्या
शिरढोण ग्रामपंचायतमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीला अखेर सुरुवात झाली आहे.
By nisha patil - 12/24/2025 5:08:41 PM
Share This News:
शिरढोण ग्रामपंचायतमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीला अखेर सुरुवात झाली आहे.
शिरढोण प्रतिनिधी – संजय गायकवाड. शिरढोण, ता. शिरोळ येथे एप्रिल २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी शिरोळ पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती दाखल झाली आहे.
सुरू आहे. त्या काळातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना बोलावून चौकशी करण्यात येत असून, या कारवाईमुळे संबंधितांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा गावात रंगली आहे.
या प्रकरणी शिरढोणच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेन यांच्याकडे तक्रार दिली होती. त्याची दखल घेत गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
विस्तार अधिकारी रवी कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी विलास फोलाणे आणि नंदकुमार निर्मळे यांच्या समितीकडून सध्या चौकशी सुरू असून, सुमारे एका आठवड्यात अहवाल सादर केला जाणार आहे.
अहवालात दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
शिरढोण ग्रामपंचायतमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीला अखेर सुरुवात झाली आहे.
|