राजकीय
“फुलेवाडीतील गायरानचा प्रश्न अखेर मार्गी! पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी घोषणा”
By Administrator - 11/1/2026 1:24:02 PM
Share This News:
फुलेवाडी परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गायरान जमिनीच्या प्रश्नावर आता ठोस तोडगा निघणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
फुलेवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
गायरान जमिनीच्या सर्वेक्षणासाठी
डीपीडीसीतून एक कोटी रुपये
तर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून एक कोटी ऐंशी लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
यामुळे नागरिकांना लवकरच या प्रश्नाचा अंतिम निर्णय झालेला दिसून येईल.
ग्रामीण स्वरूप जपणाऱ्या फुलेवाडी परिसरासाठी
नवीन जनावरांचा दवाखाना सुरू केला जाणार असून
येथील सरकारी रुग्णालयात डायलेसीससह आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी
पाटील घराण्याच्या उमेदवार माधवी मानसिंग पाटील,
तसेच महायुतीचे उमेदवार शारंगधर देशमुख, विजयसिंह ऊर्फ रिंकू देसाई आणि संगीता सावंत
यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
सभेत बोलताना मानसिंग पाटील यांनी
“फुलेवाडी हा परिसर नव्हे, तर आपले कुटुंब आहे,”
असे सांगत नागरिकांशी असलेले नाते अधोरेखित केले.
फुलेवाडीतील विकासासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून
महायुतीच्या उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
“फुलेवाडीतील गायरानचा प्रश्न अखेर मार्गी! पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी घोषणा”
|