शैक्षणिक
गुणवंतांच्या दारी शिक्षकांची वारी कोरगावकर हायस्कूलचा प्रेरणादायी उपक्रम
By nisha patil - 5/14/2025 3:18:23 PM
Share This News:
गुणवंतांच्या दारी शिक्षकांची वारी कोरगावकर हायस्कूलचा प्रेरणादायी उपक्रम
कोल्हापूर : शालांत परीक्षेचा निकाल नुकताच लागला गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कुणी दूरध्वनीद्वारे तर कुणी प्रत्यक्ष भेटून, कुणी पेढा भरवून तर कुणी पुष्पगुच्छ देऊन तर कुणी फटाक्याची माळ लावून आपापल्या पद्धतीने यशोत्सव साजरा केला .
सदर बाजार येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी मात्र गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची जाणिव लक्षात घेऊन यापुढील अडचणी आणि त्या निवारण करण्याचा शब्द देवून तसेच उज्वल यशाबद्दल पेढा भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन पालकांसह यथोचित सन्मान केला . हायस्कूलचे गुणवंत विद्यार्थी सुहाना शेख, पायल शिंदे, समृद्धी पोखर्णीकर, सुफीयान शेख, शगुफ्ता शेख यांच्या घरी जाऊन मुख्याध्यापक संजय सौंदलगे प्रमिला साजणे,सुनील साजणे,प्रभूप्रसाद रेळेकर, वर्गशिक्षक रणधीर मिरजकर हेमलता पाटील, हिम्मत सातपुते या शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि पालकांच्या प्रोत्साहनाचे कौतुक केले गुणवंताच्या दारी शिक्षकांची वारी झाल्याने सदर बाजार परिसरामध्ये या प्रेरणादायी उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले आणि शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्याध्यक्षा पल्लवी कोरगांवकर, अध्यक्षा सुचेता कोरगांवकर, सचिव एम.एस. पाटोळे उपाध्यक्ष जीनरत्न रोटे, संजीव भाई परीख यांनी मुख्याध्यापक संजय सौंदलगे तसेच सर्व शिक्षकांचे या उपक्रमाबद्दल भरभरून कौतुक केले . मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि वर्गशिक्षक रणधीर मिरजकर, हेमलता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील करिअर संबंधी मार्गदर्शन केले तसेच कोणत्याही अडचणीसाठी शाळा यापुढेही कटिबद्ध असल्याचे सांगितले . या उपक्रमाने विद्यार्थीही भारावून गेले एकूणच गुणवंताच्या दारी शिक्षकांची वारी हा कोरगावकर हायस्कूलचा उपक्रम प्रेरणादायी ठरला यात शंका नाही . शैक्षणिक वर्तुळामध्येही या उपक्रमाचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले आणि गुणवंतांना शुभेच्छा दिल्या .
गुणवंतांच्या दारी शिक्षकांची वारी कोरगावकर हायस्कूलचा प्रेरणादायी उपक्रम
|