विशेष बातम्या

शेवटची बस पन्हाळगडावर रात्री एक वाजता.

The last bus leaves Panhalgad at 1 am


By nisha patil - 10/13/2025 6:27:38 PM
Share This News:



शेवटची बस पन्हाळगडावर रात्री एक वाजता.

पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावर. काल ९,१५ वा सुटणारी पन्हाळा ही अखेरची बस ही रात्री एक वाजता पन्हाळगडावर पोहोचली.१२:३० मिनिटांनी कोल्हापूरला येथून सुटली होती. सर्व प्रवासी वाट पाहून घरातल्या लोकांना बोलवून निघून गेले. परंतु ज्याची परिस्थिती नव्हती. जे बस वरच अवलंबून होते. असेच लोक शेवटपर्यंत त्या ठिकाणी कोल्हापूर बस स्थानक या ठिकाणी बसून होते. या ठिकाणी ९ वाजून ३० मिनिटांनी सांगण्यात आले की, गाडी बंद पडली आहे. एक तास उशिरा होईल.त्यामुळे एक तास वाट पाहून सुद्धा गाडी आली नाही. तसेच गुजर या नियंत्रक याचे महिला,विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्याबरोबर बोलणं उद्धट व्हते. शेवटी या बससाठी वाहक म्हणून मदन काशीद ,चालक म्हणून संजय पाटील हे होते.ती बस हातकणंगले येते ब्रेक डाऊन झाली होती. प्रशासनाने दुसरी गाडीची सोय करणे, हे त्यांचे कर्तव्य होते. एक तर रात्रीची वेळ होती.महिला विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. तीसभर प्रवासी हे ज्यांच्याकडे घरात गाड्या होत्या त्या घरातल्या लोकांनी त्या लोकांना बस स्थानकावरून घराकडे घेऊन गेलेत.असे विद्यार्थी प्रवासी साहिल आत्तार, यांनी माहिती दिली.
             

शेवटी दहा ,बारा,प्रवासी  काम करून कोल्हापुरातून पन्हाळा येतात त्यांना येण्यासाठी रात्री एक वाजलेत. तसेच एक महिला बुधवार पेठ येथे, उतरून आपटी येथे पर्यंत चालत गेली. सध्या या परिसरात बिबट्या पिसाळला आहे. वनविभागाचे दक्षता घ्यायची लोकांना आव्हान केले आहे.अशातच जर एक महिला बुधवार पेठ इथून आपटी पर्यंत चालत जात असेल त्यावर जर हल्ला झाला असता तर त्याला एसटी प्रशासन महामंडळ जबाबदार आहे.  एक ज्येष्ठ नागरिक हे जगदाळेवाडी या ठिकाणी उतरले,
       

पन्हाळ्याचे नियंत्रण  भेटण्यासाठी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, राजू सौरटे हे गेले होते त्यावेळी  सांगितले, जर वेळेत गाड्या नाही आल्या तर सर्वच बस वाघबीळ घाटात अडवण्यात येईल.असा इशारा दिला आहे. लवकरात लवकर निवेदन देणार असल्याचे महामंडळ प्रशासनाने पन्हाळा नियंत्रक गवंडी यांना भेटून इशारा दिला आहे.
         

तसेच गडावरून कोल्हापूरकडे सव्वा पाच वाजता सुटणारी बस ही महत्त्वाचे आहे.गेले तीन दिवस ही बस  गडावरून कोल्हापूरकडे फेऱ्या झाल्या नाहीत. ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे. कारण सव्वा पाच म्हणजे शाळेची वेळ  पन्हाळगडातील तालुकास्तरीय ऑफिस याची याच वेळेत सुट्टी होते. ही बस गेले तीन दिवस नाही. याबद्दल पन्हाळा गावात नागरिक प्रवासी, शासकीय कर्मचारी यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. जर अशाच पद्धतीने गाड्या वेळेवर नाही आल्या तर मोठ्या आंदोलन उभा करण्याचा इशारा गडावरील महिला तबुसुम सय्यद व गावकऱ्यांनी दिला आहे.
       

तसेच रवींद्र धडेल माझी उपनगराध्यक्ष पन्हाळा यांनी मा. आमदार यांना फोन लावून. अमिर गवंडी यांना दिला होता.  कोल्हापूर नियंत्रक प्रमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी तो फोन उचलला नाही.

 


शेवटची बस पन्हाळगडावर रात्री एक वाजता.
Total Views: 665