बातम्या
वीरपुत्र विजय कराडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात होणार अंत्यसंस्कार
By nisha patil - 9/9/2025 2:51:13 PM
Share This News:
वीरपुत्र विजय कराडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात होणार अंत्यसंस्कार
आमदार सतेज पाटील यांनी कुटुंबियांशी घेतली सांत्वनपर भेट
देशसेवेत कार्यरत असताना अग्नीवीर जवान विजय विलास कराडे यांचे कर्तव्यावर अपघाती निधन झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. या शोकांतिका घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.
आज त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या या वीरपुत्रास श्रद्धांजली वाहिली. त्यांनी कराडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व या दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.
वीरपुत्र विजय कराडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात होणार अंत्यसंस्कार
|