बातम्या

*स्वर्गीय मसणू सुतार हे, तालुक्यातील विकास कामांचे  व्यक्तीमत्व होते-अशोकआण्णा चराटी

The late Masnu Sutar was a key figure in the taluka


By nisha patil - 9/24/2026 7:19:21 PM
Share This News:



*स्वर्गीय मसणू सुतार हे, तालुक्यातील विकास कामांचे  व्यक्तीमत्व होते-अशोकआण्णा चराटी
 

*आजरा(हसन तकीलदार):- गडहिंग्लज,आजरा आणि चंदगड तालुक्यात सर्वांना परिचीत असणारे, आजरा -बेळगाव रस्ता वाहतुकीसाठी तयार करून, आजरा -बेळगाव एस. टी. बसेसची व्यवस्था करणारे तसेच तालुक्यातील विकास कामांचे व्यक्तीमत्व म्हणजे मसणू सुतार होय, असे मत प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर उद्घाटनप्रसंगी,  आण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोकआण्णा चराटी यांनी गौरवोद्गार काढले. अध्यक्ष स्थानी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख कोल्हापूर डाॅ. चंद्रकांत परूळेकर होते.
 
 सुरवातीला  स्व.मसणू सुतार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी  प्रास्ताविक विनायक परुळेकर यांनी केले.  अशोकआण्णा यांनी बोलताना सांगितले की,सुतार साहेब हे धडाडीचे नेते होते. त्याचा वारसा पुढे चालवण्याचे काम जयवंत सुतार करत असून, आजरा तालुक्यात जास्त विकास निधी मंजूर करून भागांतील विकास कामांचे नियोजन करत असल्याने स्व.मसणू सुतारांची विकासात्मक उणीव भरून काढतील .
    

कार्यक्रमाचे अध्यक्ष परूळेकर अध्यक्षीय भाषणात म्हटले की, स्वर्गीय सुतार यांनी या भागात रस्त्याचा व पाण्याचा प्रश्न जनतेतून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्ताने ,आरोग्याचा प्रश्न घेऊन, जनतेत जाण्याचा जयवंत सुतार यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करतो, त्यांनी वाडी वस्तीवर आरोग्य शिबीर आयोजित करावीत. अडचणीत असलेल्या रूग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून व महात्मा जोतिबा फुले जीवनदाई योजनेतून मदत देऊन गोरगरीब वाड्या वास्त्यावरील जनतेला लाभ मिळवून द्यावा त्यासाठी त्यांना लागेल ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

      यावेळी संभाजी सरदेसाई, व्ही.जी.कातकर,  सी. आर. देसाई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिवपार्वती चॅरिटेबल ट्रस्ट,आजरा आयोजित श्रीगणेशा आरोग्याचा अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मलिग्रे,व देसाई हाॅस्पिटल गडहिंग्लज यांच्या माध्यमातून सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिरात दोनशे रूग्णांची तपासणी करण्यात आली.
 

यावेळी डाॅ. ज्योती चौगुले,अमोल देसाई, दशरथ अमृते, तातू आण्णा बटकडली,एम. टी.पाटील, विकास बागडी, सरपंच सुनंदा सुतार, भुषण भिंऊगडे, ऊमेश घोरपडे, अमृत सुतार, प्रकाश पाटील,सुरेश सावंत,डाॅ.गुरूनाथ पाटील,बाजीराव देवरकर,हर्षवर्धन महागावकर,आनंदा कातकर, सदाशिव सुतार, सखाराम केसरकर, संदीप केसरकर, महादेव सुतार,सुरेश गिलबीले यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन बळवंत शिंत्रे यांनी तर आभार जयवंत सुतार यांनी मानले.


*स्वर्गीय मसणू सुतार हे, तालुक्यातील विकास कामांचे  व्यक्तीमत्व होते-अशोकआण्णा चराटी
Total Views: 385