राजकीय

सांगलीतील मांगोले येथील नेतृत्वाचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

The leadership of Mangole in Sangli publicly joins the BJP


By nisha patil - 11/19/2025 11:01:42 AM
Share This News:



मुंबई : भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मांगोले (ता. शिराळा, जि. सांगली) येथील वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

यांच्यासोबत श्री शिवाजी ग्रामीण बिगर पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील, व्हाईस चेअरमन शिवाजी पवार, शिवाजी सार्वजनिक मांगोले संस्थेचे संचालक प्रकाश पाटील, माजी मुख्याध्यापक एस. एम. पाटील तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भाजप प्रवेश केला.

या प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करत, पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


सांगलीतील मांगोले येथील नेतृत्वाचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
Total Views: 34