बातम्या
बंदी बांधवांच्या जीवनात ‘जीवनविद्या’चा प्रकाश!
By nisha patil - 11/15/2025 5:24:41 PM
Share This News:
बंदी बांधवांच्या जीवनात ‘जीवनविद्या’चा प्रकाश!
मुंबईचे आजीव विश्वस्त प्रल्हादजी पै यांची बिंदू चौक कारागृहाला सदिच्छा भेट
जीवनविद्या मिशन मुंबईचे आजीव विश्वस्त प्रल्हादजी पै यांनी आज बिंदू चौक कारागृहाला दिलेल्या सदिच्छा भेटीत बंदी बांधवांना सकारात्मकतेचा प्रभावी मंत्र दिला. “रागावर नियंत्रण ठेवा, चुका टाळा आणि विचारांत बदल घडवा,” असे सांगत त्यांनी नैराश्याने खचून न जाता नव्याने उभं राहण्याचा संदेश दिला. “समाज तुम्हाला नक्की स्वीकारेल, फक्त तुमचा बदल खरा असावा,” असा विश्वास त्यांनी दिला.
2017 पासून गृह विभागाच्या मान्यतेने जीवनविद्या मिशनने कारागृहांमध्ये सुरू केलेल्या मानसिक परिवर्तन उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर जागरूकता वाढली असून वादांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. बिंदू चौक कारागृह हे 2006 पासून व्यसनमुक्त कारागृह म्हणून कार्यरत असून, स्वच्छतेतही हे कारागृह राज्यातील आदर्श मानले जाते.
अधीक्षक जठार साहेब आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीचे तसेच बंदी बांधवांच्या शिस्तीचे प्रल्हादजी पै यांनी विशेष कौतुक केले. त्यांची ही भेट बंदी बांधवांमध्ये नव्या आशा आणि विचारांची सकारात्मक ऊर्जा निर्माण करून गेली.
बंदी बांधवांच्या जीवनात ‘जीवनविद्या’चा प्रकाश!
|