ताज्या बातम्या
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापुरात प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ
By nisha patil - 1/23/2026 3:37:26 PM
Share This News:
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापुरात प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ
२६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजन
कोल्हापूर : भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता पोलीस परेड ग्राऊंड, कोल्हापूर येथे होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या समारंभास लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी कोणतीही बॅग सोबत आणू नये तसेच ध्वजारोहणापूर्वी २० मिनिटे आधी आसनस्थ व्हावे, असेही कळविण्यात आले आहे.
मुख्य समारंभात अडथळा येऊ नये यासाठी २६ जानेवारी रोजी सकाळी ८.२० ते १०.०० या वेळेत अन्य शासकीय किंवा अर्धशासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करू नयेत. कार्यालये किंवा संस्थांनी स्वतःचा ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी ८.३० पूर्वी किंवा १० नंतर घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापुरात प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ
|