राजकीय
रन फॉर युनिटी’मधून अखंड भारताचा संदेश...
By nisha patil - 10/31/2025 1:31:13 PM
Share This News:
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्यां जयंतीनिमित्त भाजपा आणि कोल्हापूर महानगरतर्फे ‘रन फॉर युनिटी – एकता दौड’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शेकडो युवक-युवती, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लहान मुलांपासून युवकांपर्यंत सर्वांनी देशभक्तीच्या जयघोषात एकतेचा संदेश दिला.
या वेळी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की, सरदार पटेल यांनी देशाच्या एकतेसाठी व स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा हा इतिहास निर्माण करणारा असून, त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमास आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, सचिव महेश जाधव आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रन फॉर युनिटी’मधून अखंड भारताचा संदेश...
|