बातम्या

जोतिबा डोंगरावर सापडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा

The murder case found on Jyotiba Mountain has been solved


By nisha patil - 4/21/2025 4:30:17 PM
Share This News:



जोतिबा डोंगरावर सापडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा

गुड खुणा मागचं सत्य उघड ; दोन आरोपी जेरबंद

कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगरावर १९ एप्रिल रोजी एका ४५ ते ५० वयोगटातील अनोळखी पुरुषाचा गळा आवळून खून करण्यात आला होता. याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी १२० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून खूनासाठी वापरलेली ओमनी कार शोधली. ही गाडी बेळगाव जिल्ह्यातील राजू हुलागी याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मयत आप्पासो बोरगावे याचा खून गौडप्पा शिंदे याच्या मदतीने केल्याची कबुली मिळाली.

या खुनामागे कौटुंबिक व वैयक्तिक वाद कारणीभूत ठरल्याचे समोर आले असून, मयताच्या भावजयशी असलेल्या नात्यावरून हे कृत्य घडल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही आरोपींना अटक करून गुन्ह्याचे पुढील तपास कोडोली पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने केली.


जोतिबा डोंगरावर सापडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा
Total Views: 180