बातम्या

गांधीनगरमधील तरुणाच्या खुनाने खळबळ.

The murder of a young man in Gandhinagar has caused a stir


By nisha patil - 8/7/2025 6:20:58 PM
Share This News:



गांधीनगरमधील तरुणाच्या खुनाने खळबळ.

सात जणांना अटक 

करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशुतोष सुनील आवळे असं पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले इथं राहणाऱ्या मृत तरुणाचे नाव आहे. गांधीनगरातील सात जणांच्या टोळक्याने त्याला दगड आणि लाकडी बॅटने बेदम मारहाण करून ठार मारल्याचे उघड झालंय. याप्रकरणी शंकर बापू बनसोडे,राजू सचिन काळोखे,शुभम संजय कांबळे, करण महेश डांगे यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केलीय .

रविवारी रात्री उशिरा आशुतोषचा मृतदेह गांधीनगर येथील पंचगंगा नदीच्या काठावर आढळून आला. पोलिसांनी मृतदेह तात्काळ उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असता डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी सुनील आवळे यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात खुनाची फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी कोयना वसाहतीतून करण डांगे याला अटक केली. चौकशीत करणने गुन्ह्याची कबुली देत सर्व घडलेला प्रकार उघड केला. मोबाईलवर गेम खेळताना मद्यधुंद अवस्थेत आशुतोषने शिवीगाळ केली आणि वाद विकोपाला गेला. त्यानंतर टोळक्याने दगड व लाकडी बॅटने मारहाण करून त्याला ठार केले आणि मृतदेह नदीकाठावर फेकून दिला.

पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सातही संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील तपास गांधीनगर पोलिस करत आहेत.


गांधीनगरमधील तरुणाच्या खुनाने खळबळ.
Total Views: 77