बातम्या
नंदवाळमध्ये विठ्ठल नामाचा गजर; पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते महाभिषेक!
By nisha patil - 11/21/2026 2:48:11 PM
Share This News:
नंदवाळमध्ये विठ्ठल नामाचा गजर; पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते महाभिषेक!
कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे भक्तिमय वातावरणात विठ्ठल भगवान यांचा महाभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते श्री विठ्ठल भगवान यांच्या चरणी विधिवत महाभिषेक करण्यात आला.
कार्तिकी एकादशीचे औचित्य साधत विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणामुळे नंदवाळ नगरीत जणू पंढरपूरचा अनुभव भाविकांना मिळाला. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत उपस्थितांनी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने नंदवाळमध्ये भक्ती आणि श्रद्धेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. यावेळी नंदवाळ देवस्थानचे भीमराव पाटील, सरपंच अमर कुंभार, उपसरपंच सविता निकम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
नंदवाळमध्ये विठ्ठल नामाचा गजर; पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते महाभिषेक!
|