बातम्या

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत उत्साहात

The new academic year began with enthusiasm in the presence of MLA


By nisha patil - 6/17/2025 2:00:08 PM
Share This News:



नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत उत्साहात

कोडोली, ता. पन्हाळा (दि. १७ जून): कोडोली येथील कन्या विद्यामंदिर, कोडोली शाळेत आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत खास अंदाजात करण्यात आले. या विशेष कार्यक्रमास आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित राहून नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, शालेय गणवेश व पुष्प देऊन मन:पूर्वक स्वागत केले आणि नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी बोलताना आमदार डॉ. कोरे म्हणाले, "शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे. इथूनच सुसंस्कारित, आत्मनिर्भर आणि सक्षम पिढी घडते. विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता इतर कौशल्ये आत्मसात करून भविष्यात यशस्वी होण्याचा मार्ग शोधावा."
शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देत विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी सक्षम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच, शिक्षक-पालक-विद्यार्थी यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास पन्हाळा तालुका शिक्षणाधिकारी शिवाजी मानकर, कोडोलीच्या सरपंच सौ. सुनिता बाजीराव केकरे, उपसरपंच डॉ. प्रशांत जमणे, माजी सरपंच शंकर पाटील, नितीन कापरे, रणजीत पाटील, प्रकाश पाटील (चेअरमन), अविनाश महापुरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांमध्ये नवीन जोश आणि प्रेरणा पाहायला मिळाली. नव्या वर्षाची ही सकारात्मक सुरुवात शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.


नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत उत्साहात
Total Views: 57