बातम्या
गोकुळ’मध्ये संचालकांची संख्या वाढणार; आता २५ संचालक
By nisha patil - 7/16/2025 12:00:02 PM
Share This News:
गोकुळ’मध्ये संचालकांची संख्या वाढणार; आता २५ संचालक
म्हैस दूध खरेदीलाही मंजुरी; शौमिका महाडिक यांचे मुद्दे सकारात्मक दृष्टिकोनातून घेणार
गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांची संख्या २१ वरून २५ करण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नविद मुश्रीफ होते.वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरी मिळणार आहे.या बैठकीत ५० हजार लिटर म्हैस दूध बाहेरून खरेदी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.यावेळी संचालक संख्यावाढीबाबत मला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. हा मुद्दा पुढील निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. सर्व विषयांमध्ये हा मुद्दा घेणे मला योग्य वाटले नाही. याबाबत सविस्तर चर्चा झाली पाहिजे.
गोकुळ संघाच्या आणि सभासदांच्या फायद्यासाठी हा निर्णय होत असल्याचे माझे समाधान झाल्यास माझाही होकार असेल. मात्र, आज समाधान न झाल्यामुळे मी विरोध केला असल्याचे मत गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी मांडले आहे.गोकुळमध्ये प्रत्येक संचालकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. सर्वांच्या मताचा आदर केला जाईल शौमिका महाडिक यांनी मांडलेले मुद्दे ही सकारात्मक दृष्टिकोनातून घेतले जातील असं वक्तव्य गोकुळचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी केला आहे.
गोकुळ’मध्ये संचालकांची संख्या वाढणार; आता २५ संचालक
|