राजकीय
शुभलक्ष्मी कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पन्हाळ्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष जयश्री पोवार यांचा कार्यालय प्रवेश
By nisha patil - 2/1/2026 12:11:28 PM
Share This News:
पन्हाळा प्रतिनिधी,शहाबाज मुजावर:- पन्हाळ्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष जयश्री पोवार यांचा कार्यालय प्रवेश आज पार पडला त्यावेळी पन्हाळागडाच्या विकासासाठी आमदार डॉ विनय कोरे यांच्या प्रयत्नातून सहकार्य करणार असल्याची ग्वाही सावित्री महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांनी दिली. तसेच सावकर साहेबानी महाराष्ट्रातील पन्हाळा गडावर एकमेव असे 13D थेटर उभारले आहे. ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत आहेत. त्या थेटरला चांगलाच प्रतिसाद पर्यटकांचा मिळत आहे.असेच नव,नवीन उपक्रम आपल्या पन्हाळावर राबवण्याचा आमचा प्रयत्न असेल,पन्हाळा येथील नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा पोवार यांच्या नगराध्यक्ष कक्षातील प्रवेशाचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जयश्री प्रकाश पवार बोलताना सांगितले की ,पन्हाळातील पाण्याचा प्रश्न हा ज्वलंत आहे.पहिल्या सहा महिन्यात तो प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करणार, महिलांसाठी उद्योग शुभलक्ष्मी कोरे यांनी त्यांच्या माध्यमातून आणावे असे आव्हान त्यांनी कोरे वहिनींना केले व पन्हाळा वासियांना सहकार्य करावे. तसेच पर्यटकांसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या चांगल्या सोयी सुविधा देण्याचा आमचा मानस आहे.तसेच पर्यटन वर अवलंबून असणारे उद्योग वाढवण्याचा लोकांच्या हातात काम देण्याचे प्रयत्न करणार असे पवार नगराध्यक्षानीं आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच यावेळी ईशान्य कोरे ,यांनी सांगितले की,ज्यावेळी २०२४ साली आमदार साहेबांनी आमदारकीला उभारले होते. त्यावेळी शाहूवाडीचे मते मोजण्यास सुरुवात झाली. यावेळी शाहूवाडी मध्ये थोडे लीड घेतल्यानंतर पन्हाळा येथील मतमोजणी सुरुवात झाली. त्यावेळी आपल्याला पन्हाळातील जनता साथ देणार असा विश्वास मनात होता.आणि तो कायम आहे. आणि पन्हाळानी त्यांना साथ दिली. तसेच पन्हाळा हा साहेबांचा बालेकिल्ला होता,आहे. तो असणार तसेच सावकार साहेब आईंचं एखाद्या पुत्रावर प्रेम असतं तसं प्रेम या पन्हाळ्यावर आहे. तसेच या मतदार संघ मधले जे लोक आहेत.एखाद्या आईला जशी आपल्या पुत्राला प्रेम करतात. तशी येथील लोक सावकार साहेबांवर प्रेम करतात.
तसेच जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते ॲड. राजेंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आपला पक्ष हा भाजपचा मित्रपक्ष आहे.तो सत्तेच्या बाजूने आहे.त्यामुळे पन्हाळगडावर कधीही निधी कमी पडायला दिले नाही.आणि तो दिला जाणार नाही. असे आश्वासन दिले.जनसुराज्य कारकिर्दीमध्ये जे काम झाले आहे. याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
यावेळी सर्व नगरसेवकांचा प्रशासनामार्फत सत्कार करण्यात आला, यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, नंदकुमार कांबळे, सुहास भोसले, तसेच माजी नगरसेवक ॲड.रविंद्र तोरसे, शिव-शाहू आघाडीचे प्रमुख सतीश भोसले सुनील हावळ, चैतन्य भोसले, शरद शेडगे, रमेश स्वामी, आनंद जगताप, माजी नगराध्यक्ष दिपा काशीद, इंद्रायणी आडनाईक, वेदांतिका भोसले यांच्या सह नूतन नगरसेवक,आजी माजी नगरसेवक सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
शुभलक्ष्मी कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पन्हाळ्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष जयश्री पोवार यांचा कार्यालय प्रवेश
|