खेळ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० षटकार ठोकणारा जगातील एकमेव खेळाडू
By nisha patil - 1/13/2026 11:36:25 AM
Share This News:
'हिटमॅन' अशी ओळख असणारा भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मान न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन डे सामन्यात फलंदाजी करताना एक अभूतपूर्व इतिहास रचला आहे. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रोहितने क्रिकेट विश्वात ६५० षटकार ठोकत असा पराक्रम केला, जो आजवर कोणत्याही खेळाडूला जमलेला नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० षटकारांचा टप्पा पूर्ण
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहितने २९ चेंडूंत २६ धावांची खेळी केली. या छोट्या खेळीत त्याने ३ चौकार आणि २ शानदार षटकार ठोकले. या दोन षटकारांच्या जोरावर रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, वन डे आणि टी-२० मिळून) आपल्या ६५० षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे. जागतिक क्रिकेटच्या इतिहासात ६५० षटकार मारणारा रोहित हा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला.
ख्रिस गेलचा विक्रम मोडला
रोहितने या सामन्यात केवळ ६५० षटकारांचा टप्पाच गाठला नाही, तर त्याने 'युनिव्हर्सल बॉस' ख्रिस गेलचा एक मोठा विक्रमही मोडीत काढला. वन डे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक घटकार मारण्याचा मान आता रोहित शर्माकडे गेला आहे. सलामीवीर म्हणून रोहितच्या नावावर आता ३२९ षटकार जमा झाले आहेत, तर ख्रिस गेलने ३२८ षटकार मारले होते
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० षटकार ठोकणारा जगातील एकमेव खेळाडू
|