बातम्या

कोल्हापूरच्या मातीतील थोर विचारवंत डॉ.जयसिंगराव पवार यांचे निधन; संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

The passing away of Dr Jaisingrao Pawara great thinker from Kolhapurs soil

By Administrator - 3/26/2026 12:45:00 PM
Share This News:

कोल्हापूरच्या मातीतील थोर विचारवंत डॉ.जयसिंगराव पवार यांचे निधन; संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

मराठी इतिहास संशोधनातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि कोल्हापूरच्या मातीतील थोर विचारवंत डॉ.जयसिंगराव पवार यांचे निधन झाले. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आहे.

राजर्षी शाहू स्मारक ग्रंथाचे लेखन संपादन हे इतिहास मांडणीचा मानदंड ठरावा. शाहू महाराजांचे जीवन व कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे पवार सरांनी आपले लाईफ मिशन मानले होते. शाहू महाराजांच्या जीवनावरील फक्त ग्रंथाची निर्मिती केली नाही तर हा ग्रंथ भारतातील आणि विदेशातील अनेक भाषांमध्ये प्रकाशित करून शाहू चरित्र सर्वदूर पोहोचावे म्हणून प्रयत्न केलेले पवार सर हे पहिले आहेत.

महाराष्ट्र इतिहासाची अशी सेवा करत असतानाच सरांनी राजर्षी शाहू स्मारक भवन सारख्या एका महत्त्वाच्या सांस्कृतिक केंद्राच्या संचालक पदापासून ते शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राच्या संचालक पदापर्यंतची धुरा गेली अनेक वर्ष आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली होती.
 
कोल्हापूरच्या मातीतील थोर विचारवंत डॉ.जयसिंगराव पवार यांचे निधन; संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
Total Views: 7