बातम्या

"लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लढायला निघाला देशभक्त वर!

The patriotic groom went to fight the very next day after his wedding


By nisha patil - 9/5/2025 3:42:59 PM
Share This News:



"लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लढायला निघाला देशभक्त वर!

खेडगाव नंदी (ता. पाचोरा): गावाचा सुपुत्र आणि भारतीय सेनेतील शूर जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा विवाह ५ मे रोजी पाचोरा येथे यामिनी हिच्याशी पार पडला. मात्र, लग्नाची वरात गावात वाजते न वाजते तोच देशात निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे मनोजला आपल्या बटालियनकडून तातडीने हजर होण्याचे आदेश मिळाले.

अंगावरच्या हळदीचा रंगही नीट सुकलेला नसतानाच, देशसेवेच्या शपथेप्रमाणे मनोजने आपल्या पत्नी आणि कुटुंबियांचा निरोप घेत देशरक्षणासाठी प्रस्थान ठेवलं.

त्याची नववधू यामिनीने सुद्धा धैर्य दाखवत, “सिंदूर ऑपरेशनसाठी, देश रक्षणासाठी मी माझं कुंकू पाठवतेय,” अशा शब्दांत आपलं देशप्रेम व्यक्त केलं. यामिनीच्या या भावनेला संपूर्ण गावानं आणि जिल्ह्यानं सलाम ठोकला आहे.

या घटनेमुळे मनोज आणि यामिनीचं देशभक्तीचं उदाहरण सर्वांसमोर आलं असून, त्यांच्या कुटुंबावर आणि गावावर अभिमानाचा उधाण आलं आहे.

"देश प्रथम" या मूल्याची जिवंत साक्ष म्हणजे मनोज आणि यामिनी.
सैनिक मनोज पाटील आणि त्यांच्या रणरागिणी पत्नी यामिनी यांना सलाम!


"लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लढायला निघाला देशभक्त वर!
Total Views: 124