राजकीय

मुरगूड नगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरण बदलले; शिंदेसेना-भाजप युतीचा मोठा विजय

The political equation changed in the Murgud Municipality elections


By nisha patil - 12/21/2025 11:39:05 AM
Share This News:



मुरगूड :- मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय चित्र स्पष्ट झालं असून, शिंदेसेना-भाजप युतीने जोरदार मुसंडी मारली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत युतीच्या उमेदवार सौ. सुहासिनी प्रवीणसिंह पाटील यांनी विजय मिळवला असून, नगरसेवक पदाच्या १६ उमेदवारांनी यश संपादन केलं आहे.
या निकालामुळे मुरगूडमधील सत्तासमीकरण पूर्णतः बदलल्याचं चित्र आहे. दुसरीकडे, मंत्री हसन मुश्रीफ – राजे गटाला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळू शकलं नाही. या गटाला फक्त ४ जागांवर समाधान मानावं लागलं, त्यामुळे त्यांना राजकीय धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न, विकासकामं आणि नेतृत्वावर मतदारांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडल्याचं या निकालातून दिसून येत आहे. विशेषतः नगराध्यक्षपदाच्या लढतीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून होतं, आणि निकालानंतर शिंदेसेना-भाजप युतीच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
या विजयामुळे आगामी काळात मुरगूड नगरपालिकेतील कारभारावर शिंदेसेना-भाजप युतीची पकड मजबूत होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत.


मुरगूड नगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरण बदलले; शिंदेसेना-भाजप युतीचा मोठा विजय
Total Views: 103