बातम्या

ऐतिहासिक महात्मा गांधी मैदानाची दुरवस्था गांधी जयंती व दसऱ्यापूर्वी डागडूजीची मागणी

The poor condition of the historic Mahatma Gandhi Maidan

By nisha patil - 9/21/2025 10:05:56 PM
Share This News:

ऐतिहासिक महात्मा गांधी मैदानाची दुरवस्था गांधी जयंती व दसऱ्यापूर्वी डागडूजीची मागणी

कोल्हापूर :शहरातील ऐतिहासिक महात्मा गांधी मैदान सध्या पूर्णपणे दुरवस्थेत सापडले असून महापालिकेने या मैदानाकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे. येत्या २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि दसऱ्याच्या निमित्ताने मैदानाची डागडूजी करावी, अशी मागणी शिवाजी पेठेतील नागरिकांनी केली आहे.

मैदानावर सर्वत्र गवताचे साम्राज्य, सांडपाणी व चिखल पसरला आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून परिसरात अस्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “पूर्वी या मैदानावर अनेक ऐतिहासिक सभा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक उपक्रम होत असत. मात्र गेली अनेक वर्षे मैदानाला अवकळा प्राप्त झाली असून त्याकडे महापालिकेने कानाडोळा केला आहे.”

ऐतिहासिक महात्मा गांधी मैदानाची दुरवस्था गांधी जयंती व दसऱ्यापूर्वी डागडूजीची मागणी
Total Views: 64