बातम्या
“कोल्हापूरत गोरगरीबांचा तोंडाची घास हिरावला; शिवसेनेचा मंत्र्यांवर काळा झेंडा”
By nisha patil - 7/10/2025 5:21:01 PM
Share This News:
“कोल्हापूरत गोरगरीबांचा तोंडाची घास हिरावला; शिवसेनेचा मंत्र्यांवर काळा झेंडा”
कोल्हापूर – निवडणुकीच्या तोंडावर आणि पाच किलो “आनंदाचा शिधा” देण्याचा नाटक करणाऱ्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सहयोगी पक्षातील नेत्यांना आता कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी कात्रीत पकडले आहे. गरिबांसाठी सुरू असलेल्या ‘शिवभोजन’ सारख्या योजनांचा निधी थांबवून, कोट्यावधींच्या निधीची गप्पा करणाऱ्या मंत्र्यांनी दिवाळीच्या तोंडावर जनतेला आनंदाचा शिधा का दिला नाही याचा खुलासा करावा, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला आहे.
खरं तर, अनेक सामाजिक आणि विकासाच्या योजना निधीअभावी बंद पडत असताना, गोरगरीबांसाठी चालत असलेल्या ‘शिवभोजन’ थाळींचे अनुदान थांबवणे हे जनतेच्या हिताच्या विरोधात असल्याचे इंगवले यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आणि शिवसैनिक यांनी मंत्री वर्गाच्या दौऱ्याच्या वेळी त्यांचा निषेध करत काळे झेंडे दाखवण्याचा उपक्रम उभारला जाणार असून, सरकारचे निव्वळ मतपेटीचे राजकारण झेलणारी ही पहिलीच घटना नाही.
रविकिरण इंगवले यांनी म्हटले की, गोरगरीब जनतेच्या प्रश्नासंदर्भात कोणताही राजकीय खेळ करणाऱ्यांना कोल्हापूरची स्वाभिमानी शिवसेना तितक्याच जोमाने उत्तर देईल, भले त्याचे परिणाम काहीही असले तरी.
“कोल्हापूरत गोरगरीबांचा तोंडाची घास हिरावला; शिवसेनेचा मंत्र्यांवर काळा झेंडा”
|