ताज्या बातम्या

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन

The presence of the Varna family


By nisha patil - 12/13/2025 1:31:17 PM
Share This News:



वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते व सहकार चळवळीचे आधारस्तंभ सहकारमहर्षी विश्वनाथ आण्णा उर्फ तात्यासाहेब कोरे यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर), श्री. विश्वेश निपुणरावजी कोरे व कु. ज्योतिरादित्य विनय कोरे यांनी समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू), जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्यासह वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहातील सर्व संचालक, जनसुराज्य शक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी उभारलेल्या वारणा सहकारी चळवळीमुळे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून त्यांचा विचार व कार्य आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन
Total Views: 13